Video: विद्यानंद बापट यांना मारहाण; DJ-लाऊडस्पीकर विरोधात माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी हात उचलला


Vidyanand Bapat Attack News Updates: गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सावात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी केली असून गेल्या काही दिवसांपासून ते याबद्दल आग्रही भूमिका मांडत आहेत. याबद्दल आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यानंतर पोलीस याबद्दलची चौकशी करत आहेत.

या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी वृत्तवाहिनीशी बोलत असताना काही टवाळखोरांनी येऊन मला बोलण्यापासून रोखले. त्यांना माझी भूमिका पटलेली नसावी. मी वाहिनीशी बोलत असताना निशस्त्र होतो, याचाच फायदा घेऊन त्यांनी मला बोलण्यापासून रोखले आणि मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांना सवंग प्रसिद्धी हवी होती, म्हणून त्यांनी हे कृत्य केले असावे. मुद्द्यांना मुद्द्याने उत्तर देता येत नाही, त्यावेळी अशाप्रकारे भूमिका घेतली जाते. सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

विद्यानंद बापट पुढे म्हणाले की, मला सवंग प्रसिद्धी कधीही नको आहे. पण ज्या लोकांना अशाप्रकारची प्रसिद्धी आहे, त्यांच्याकडून अशाप्रकारे मारहाण करता येते. वेडे लोक असतात ते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. माझा गणेशोत्सवाला कधीही आक्षेप नव्हता. मी फक्त डिजेच्या आवाजाला विरोध केला होता.

हेही वाचा

सत्ताधारी भाजपाची दादागिरी वाढली – प्रशांत जगताप

दरम्यान या घटनेनंतर पुण्यातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. “विद्यानंद बापट हे समस्त पुणेकरांची बाजू मांडत आहेत. त्यांचा धार्मिक सणांना अजिबात विरोध नाही. फक्त डिजेच्या माध्यमातून जी विकृती वाढत आहे. त्याला त्यांचा विरोध आहे. या संदर्भात बापट काही मुद्दे मांडत आहेत. पण सत्ताधारी मंडळीचा त्यांना पाठिंबा नाही. आज थेट त्यांना थेट मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. यावरून सत्ताधारी भाजपाची दादागिरी वाढली असल्याचे दिसत आहे. चुकीच्या प्रवृत्तींना पुण्यात बळ दिले जात आहे, हेही यानिमित्ताने दिसले”, अशी टीका प्रशांत जगताप यांनी दिली.

https://www.youtube.com/<a href="https://www.amazon.in/s?k=watch&tag=proffercoupon-21" rel="nofollow sponsored" class="amazon-affiliate-link" target="_blank">watch</a>?v=0LUHf7Gnde8

कोण आहेत विद्यानंद बापट?

पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात भूमिका मांडल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले होते. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी बैठकीतून बाहेर काढले. या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर विविध माध्यमांना त्यांनी मुलाखती देऊन आपली मागणी पुढे केली.

हेही वाचा

विविध माध्यम आणि पॉडकास्टना दिलेल्या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी त्यांचा ध्वनिप्रदुषणाबाबतचा मुद्दा अत्यंत चपखलपणे मांडला आहे. संयत, संयमी आणि प्रभावी मराठी भाषेत त्यांनी त्यांचा मुद्दा समाजासमोर ठेवला आहे. त्यांची ओघवती भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतील शब्द लोकांची पसंती मिळत आहे.

https://www.youtube.com/<a href="https://www.amazon.in/s?k=watch&tag=proffercoupon-21" rel="nofollow sponsored" class="amazon-affiliate-link" target="_blank">watch</a>?v=FhmZvOm-jgI

३७ वर्षीय विद्यानंद बापट हे बीपीओमध्ये काम करतात. मुळचे रत्नागिरीची असलेले बापट गेल्या सात वर्षांपासून ते पुण्यातील नारायण पेठेत स्थायिक झालेले आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.





Source link

Scroll to Top