Upcoming Releases on OTT: या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी सजली आहे. Netflix, Amazon Prime Video, SonyLIV आणि JioHotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर विविध जॉनरमधील नवे सिनेमे आणि सीरिज रिलीज होणार आहेत. क्राइम थ्रिलरपासून रोमँटिक ड्रामापर्यंत आणि अॅक्शन एंटरटेनमेंटपर्यंत प्रेक्षकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असतील.
तू या मैं
रिलीज डेट – 10 एप्रिल
कुठे पाहाल – Netflix
आदर्श गौरव आणि शनाया कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा रोमँटिक सर्वायव्हल थ्रिलर दोन इन्फ्लुएंसर्सच्या आयुष्याभोवती फिरतो. गोव्यातील ट्रिपदरम्यान ते एका जीवघेण्या परिस्थितीत अडकतात.
ओ’ रोमियो
रिलीज -8 ते 10 एप्रिल
कुठे पाहाल – Amazon Prime Video
शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असणारी ही थ्रिलर फिल्म आता OTT वर उपलब्ध होणार आहे.

मी, तू आणि फुजी
रिलीज डेट – 10 एप्रिल
कुठे पाहाल – SonyLIV
ही मराठी रोमँटिक ड्रामा कथा एका जोडप्याभोवती फिरते, जे 7 वर्षांनंतर जपानमध्ये पुन्हा भेटतात आणि आपल्या नात्याचा पुनर्विचार करतात.

टर्न ऑफ द टाइड -3
रिलीज डेट – 10 एप्रिल
कुठे पाहाल – Netflix
या अंतिम सीझनमध्ये मुख्य पात्र आपल्या मित्रांसोबत समाजासाठी लढा देताना दिसणार आहे.

Thrash
रिलीज डेट – 10 एप्रिल
कुठे पाहाल – Netflix
वादळानंतरच्या भयानक परिस्थितीत अडकलेल्या लोकांची कथा, ज्यात शार्कचा धोकाही आहे. हा सिनेमा थरार वाढवेल.
The Boys Season 5
रिलीज डेट -8 एप्रिल
कुठे पाहाल – Amazon Prime Video
लोकप्रिय सुपरहिरो सीरिजचा शेवटचा सीझन अधिक भयानक आणि थरारक असणार आहे.

18th Rose
रिलीज डेट – 9 एप्रिल
कुठे पाहाल – Netflix
एका तरुणीच्या स्वप्नांच्या प्रवासाची आणि प्रेमकथेची ही भावनिक कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

आणखी वाचा



