सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा


Satara landslide News :  राज्याच्या काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबईसह कोकण, पुणे सातारा या भागात चांगला पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळं काही भागात वाहतुकीला देखील अडछणी येत आहेत. अशातच सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

दरडीमुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा 

दरडीमुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा साचल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी सह्याद्री ट्रेकर्स मदतकार्यात सहभागी झाले असून, मार्ग मोकळा करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दरड हटवण्याच्या कामादरम्यान एक जेसीबीही दरडीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडे तातडीने अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत मार्ग पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सातारा–महाबळेश्वर मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जेसीपी दरड काढण्यासाठी गेला होता तो देखील दरडीमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील नेरळ माथेरान घाटात अपघात, पर्यटकांची कार तीव्र वळणावरून घसरली, चार प्रवासी जखमी 

रायगड जिल्ह्यातील नेरळ माथेरान घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. माथेरान फिरण्याकरिता आलेल्या पर्यटकांची कार तीव्र वळणावरून घसरली आहे. सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरुप कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उल्हासनगर हून माथेरान ला आलेल्या पर्यटकांचा परतीकडे जात असताना घाटातील तीव्र वळणावर अपघात झाला आहे.  वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला घसरली.कार मधील चारही प्रवासी थोडक्यात बचावले. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर भीषण अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  हरदोली गावाजवळ कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार थेट कालव्यात जाऊन कोसळली आहे. या भीषण कार अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात लीलाबाई गौतम (वय ६६) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

https://www.youtube.com/<a href="https://www.amazon.in/s?k=watch&tag=proffercoupon-21" rel="nofollow sponsored" class="amazon-affiliate-link" target="_blank">watch</a>?v=a5B0FhXuLoY



Source link

Scroll to Top