1983 world cup viral bill
नवी दिल्ली : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. लंडनमध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले होते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो एका हॉटेलच्या बिलासारखा दिसत आहे. या व्हायरल बिलाच्या आधारे असा दावा केला जात आहे की, १९८३ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाने रात्रीच्या पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात दारू आणि सिगारेट खरेदी केली होती. मात्र, माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या कीर्ती आझाद यांनी हे व्हायरल बिल ‘फेक’ (बनावट) असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या स्पर्धेत भारताकडून तीन सामने खेळले होते.


