राकेश बापट-विशाल कोटियनमध्ये राडा; घटस्फोटाच्या कमेंटवरून भांडण, बिग बॉस संतापले!


बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या सीझनच्या ग्रँड फिनालेला आता फार कमी दिवस उरले आहेत. अशातच फिनालेत जाण्याची चढा-ओढ सर्वच सदस्यांमध्ये पाहायला मिळतेय. शोमध्ये जवळपास ८० दिवस घालवल्यानंतर बाहेर जावं लागू नये, यासाठी नॉमिनेट न होण्याकडे त्यांचा कल दिसून येतोय. अशातच या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने एक मोठी गुगली टाकली.

बिग बॉसने घरातील स्पर्धकांना असा टास्क दिला, ज्यामुळे कोणाचं फिनालेत जाण्याचं स्वप्न तुटणार हे स्पर्धकांच्याच निर्णयाने ठरणार होतं. कलर्स मराठीने या टास्कचा धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, या प्रोमोत दोन स्पर्धकांमध्ये मोठा राडा होता, ज्यामुळे बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागतो. बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार, ते जाणून घेऊयात.

“ज्यांचा टीव्ही फुटणार, त्यांचं फिनानेला जायचं स्वप्न तुटणार,” बिग बॉसच्या आवाजातील या डायलॉगने प्रोमोची सुरुवात झाली. बिग बॉसने घरातील सदस्यांना नॉमिनेशन टास्क दिला. त्यात घरातील स्पर्धकांना त्या स्पर्धकाचा टीव्ही फोडायचा होता, ज्याला त्यांना फिनालेला जाऊ द्यायचं नाही. या प्रोमोत राकेश बापटच्या निर्णयाबद्दल दाखवण्यात आलंय. राकेशने विशाल कोटियनचं नाव घेतलं.

Award Banner
हेही वाचा

राकेश म्हणाला, “मी विशालचं नाव घेतोय. तो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतो, या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या.” हे ऐकताच विशाल भडकला. “तू जेव्हा माझ्या वयाबद्दल बोलतो तेव्हा पर्सनल नाही का? तुझा घटस्फोट काय झालाय…” विशालचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच राकेश संतापतो आणि “तू माझा घटस्फोट कशाला काढतोय,” असं विचारतो.

हेही वाचा

पाहा बिग बॉस मराठीचा प्रोमो

यानंतर राकेश व विशाल भिडतात आणि इतर सर्व सदस्य त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. दोघांमधील भांडण इतकं वाढतं की बिग बॉसला मध्ये पडावं लागतं. “राकेश – विशाल लांब व्हा,” असं बिग बॉस त्यांना ओरडून सांगतात आणि घरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं.

हेही वाचा

बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत. विशाल राकेशवर जळतो, एकच नंबर राकेश, तर राकेशकडे दुसरा मुद्दाच नसतो एकाच मुद्द्यावर तो खेळतो, विशाल बाहेर जाणार, बाकीचे सदस्य जेव्हा विशालच्या पर्सनल लाइफबद्दल बोलतात त्याचं काय, अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत. काहींनी राकेश बापटची बाजू घेतलीये, तर काहींनी विशाल बरोबर असल्याचं म्हटलंय. आता या दोघांमधील वाद किती विकोपाला जातो आणि बिग बॉसच्या घरात काय घडणार हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.





Source link

Scroll to Top