कमकुवत वारे आणि प्रतिकूल व्यापक हवामान परिस्थितीमुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता वाढली आहे. यामुळे नेहमीच्या १ जूनच्या तारखेपर्यंत मान्सून येण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.भारतीय हवामान विभागाने यापूर्वी केरळमध्ये मान्सूनचे आगमन सुमारे २६ मे रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.मात्र यात चार दिवसांची कमी-जास्त होण्याची शक्यता होती. मात्र, अलीकडील हवामान बुलेटिनमध्ये या वेळेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.


